Monday, 31 March 2008

याद - आठवण

आज का दिन भी याद रहेगा |
आज वो मुझ को याद न आए ||
अख्तर नज्मी

आजमितीचा दिवसही खरोखर लक्षात राहील ।
आज आठवण न झाली तुझी,कोण विसरील ॥

तुम्हारे बसमें अगर हो तो भूल जाओ मुझे ।
तुम्हें भुलाने में शायद मुझे ज़माना लगे ॥


आवाक्यात असेल तर, तुच विसर कसं मला ।
या जन्मी तरी शक्य नाही, विसरणं मी तुला ॥

वो उन्हें याद करें जिसने भुलाया हो कभी ।
हमने उनको न भुलाया न कभी याद किया ॥


विसरला असाल तुम्ही कुणाला, तर जरुर आठवावं ।
विसरलोच नाही आम्ही त्यांना, तर कुठून आठवावं ॥

याद को तेरी टूट के चाहा ।
दिल को ख़ूब सजा दी हमने ॥


प्राणापलीकडे जपली तुझी ती आठवण आम्ही ।
किती भयाण शिक्षा दिली या हृदयाला आम्ही ॥

क्यों आज उनका ज़िक्र मुझे ख़ुश न कर सका?
क्यों आज उनका नाम मेरा दिल दुखा गया?


नामोल्लेखाने आज तुझ्या,नाही मुळी आम्हा सुखावलं ।
नावाने आज तुझ्या, का बरं हृदयास माझ्या दुखावलं ॥

अब आप सामने है तो कुछ भी नही है याद ।
वरना हमें आपसे कुछ कहना ज़रूर था ॥


आता जेव्हा तू समोर आहेस, तेव्हा आठवेना काही ।
शप्पत सांगतो, खरंच बोलायचं होतं तुझ्याशी काही ॥

गुज़र जाओ बचकर हरएक याद से ।
कोई शाम यूँ भी गुज़ारा करो ॥
क़ज़लबाश

कधी तिच्या-त्याच्या आठवणींपासून स्वतःस वाचवा ॥
एखादी संध्याकाळ अशी त्या आठवणीविनांही घालवा ॥

अब किसकी थी उस वक्त ख़ता याद नही
किस तरह हम हुए जुदा याद नही ।
है याद वो गुफ़्तगूकी तल्ख़ी लेकिन
’आजाद’ वा गुफ़्तगू थी क्या याद नही ॥
जगन्नाथ ’आजाद’

दोष असे तो कुणाचा, आम्हा याद नाही
घडला वियोग कसा, आम्हा याद नाही ।
याद ती कटूता, जर असेलच याद काही
संभाषण ते दुर्देवी मात्र आम्हा याद नाही ॥

ये इल्म का सौदा, ये रिसाले, य किताबें ।
इक शख्स की यादों को भुलाने के लिए है ॥
जाँ नीसार अख़्तर

हे ज्ञानार्जन, हे मोठाले ग्रंथ, तीच स्वप्रतारणा पाठी ।
हे सगळं केवळ एका व्यक्तीला समूळ विसरण्या साठी ॥

Monday, 24 March 2008

ज़िन्दगी - जीवन

ज़िन्दगी हमसे तेरे नाज़ उठाए ना गए ।
साँस लेनेकी फ़क़त रस्म अदा करते रहे ॥
’शाज’ तमकवत

जीवना, ऐट तुझी ती आम्हा, सांभाळता आली नाही खरी ।
औपचारिकताच काय ती फ़क्त श्वासांची करत राहीलो पुरी ॥

या रब नहीं मैं वाक़िफ़-ए-रुदाद-ए-ज़िन्दगी ।
इतनाही याद है की जिया और मर गया ॥
’सीमाब’अकबराबादी

हे ईश्वरा,माझी कसली कहानी अन्‌ कुठून ती दुनियादारी ।
हक़िकत एवढीचं की जगलो काही क्षण अन्‌ मरण दारी ॥

Sunday, 23 March 2008

दिल - हृदय

दिल के हाथों कहीं दुनियामें गुजारा न हुआ।
हम किसीके न हुए, कोई हमारा न हु़आ॥
अहमद ’फ़राज़’

जगतात या हृदयापायी, कुणाचं असं फ़ार भलं झालंय ।
आम्ही झालो कधी कुणाचे,कुणी आम्हास आपलं म्हटलंय ॥

मगर कभी कोई देखे, कोई पढे तो सही।
दिल आईना है तो चेहरा किताब जैसा है॥
अश‍अर

जरा निरखून पहाल त्याला अन् वाचाल तर खरं।
हृदय ते स्वच्छ दर्पण अन्‌ चेहरा खुलं पुस्तक बरं॥

क़ाफ़ी है मेरे दिल की तसल्ली कों यही बात ।
आप आ न सके, आपका पैगाम तो आया ॥
शकील बदायूनी

इतुके पुरे हृदयास माझ्या, काही ताण हलका जरी झाला ।
भलेही तू येऊ शकली नाही,परंतू तुझा निरोप तरी आला ॥

अपनों ने नजर फ़ेरी, दिलने तो दिया साथ ।
दुनिया में कोई दोस्त मेरे काम तो आया ॥
शकील बदायूनी

आप्तांनी फ़िरविली नजर,परंतू या हृदयाने तर दिली साथ ।
जगी या असा हा एकच मित्र, ज्याने मानली माझी बात ॥

दिल टूटने की थोडीसी तकलीफ़ तो हुई ।
लेकिन तमाम उम्रको आराम तो हो गया ॥
सफ़ी लखनवी

हृदय दुभंगले तेव्हा, तडफ़ड काहीशी झाली खरी ।
तहहयातीची मात्र त्याने, निश्चिंत बेगमी केली परी ॥